कोकण

खेड नगरपालिकेकडून ७३ जणांना नोटीस

CD

खेड नगरपालिकेकडून
७३ जणांना नोटीस
धोकादायक बांधकाम; परवानगी घेऊनच बांधकाम करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ः शहरातील महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी खासगी चाळीचा काही भाग मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरप्रशासनाने यापूर्वीच शहरातील धोकादायक बांधकाम असणाऱ्यांना ७३ जणांना नोटीस बजावल्या आहेत. नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन धोकादायक ठिकाणांचे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्यादृष्टीने प्रभारी मुख्याधिकारी चेतन विसपुते, प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्जता ठेवली आहे. विशेषत: पूरप्रवण क्षेत्रावर करडी नजर ठेवण्यात आली असून, कर्मचाऱ्यांसह मदतकर्त्यांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महाडनाका येथील खासगी रिकामी चाळ कोसळल्यानंतर धोकादायक बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; मात्र महाडनाका येथील धोकादायक स्थितीतील रिकामी चाळ खाली करण्यासाठी संबंधित मालकास पालिकेने यापूर्वीच नोटीस बजावली होती तसेच शहरातील विविध भागातील धोकादायक बांधकाम असणाऱ्या ७३ जणांनाही नोटीस बजावल्या होत्या. यातील काहींनी नोटिशीला सकारात्मक प्रतिसाद देत रितसर परवानगी घेऊन बांधकामेही केली आहेत; मात्र काहीजणांनी नोटिशीला केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT