India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Digital Census India : १५ वर्षांनंतर देशात १ एप्रिल २०२६ पासून जनगणना सुरू झाली असून महाराष्ट्रात ती १ मेपासून होणार आहे. ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असून मोबाइल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा उपलब्ध आहे.
Digital Census India

Officials collecting household data using mobile devices as part of India’s first digital census 2026

esakal

Updated on

India Census 2026 : देशात १५ वर्षांनंतर होणारी जनगणना म्हणजेच १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ही जनगणना १ मेपासून सुरु होणार आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीसोबतच मोबाइल अॅप आणि स्व-गणनेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. १ ते १५ मे या कालावधीत ज्यांना शक्य आहे ते स्वत:ची माहिती अधिकृत पोर्टलवर भरू शकतात. इतरांसाठी १६ मे पासून १४ जूनपर्यंत नेहमीच्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यातील जनगणना होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com