पुण्यात गंगाधाम चौक, आईमाता मंदिर येथे एका केमिकल कंपनीत मोठ्या प्रमाणात टाकीमधून गॅस लिकेज झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी बी ए सेट परिधान करून हे रेस्क्यू यशस्वी केलं. या परिसरातील 17 नागरिकांना श्वसनास ञास झाल्याने त्यामधील 14 नागरिकांना शासकीय रुग्णवाहिका क्रमांक 108 मधून रुग्णालयात नेले. अग्निशमन दलाचे एक अधिकारी व एक जवान यांना देखील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.