कोकण

रत्नागिरी- आमदार डावखरेंच्या विजयाचा भाजपातर्फे जल्लोष

CD

९४२६८

आमदार डावखरेंच्या विजयाचा भाजपतर्फे जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : कोकण विभाग पदवीधर मतदार संघात भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी हॅट्ट्रिक केली. त्यांनी १ लाख ७१९ मते मिळवून विजय मिळवला. याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप जिल्हा संपर्क कार्यालयासमोर जल्लोष केला. फटाके वाजवून आणि भाजपचा जयजयकार करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी नेरूळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे झाली. या निवडणुकीत एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १ लाख ३२ हजार ७१ मते वैध ठरली. ११ हजार २२६ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ६६ हजार ३६ इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला. १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येत भाजपचे निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा विजयी झाले.
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, कोकण पदवीधर जिल्हा संयोजक मनोज पाटणकर यांच्यासह उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा दिल्या. या वेळी शहराध्यक्ष राजन फाळके, नितीन गांगण, राजन पटवर्धन, नितीन जाधव, डॉ. हृषिकेश केळकर, मंदार खंडकर, योगेश हळदवणेकर, मंदार भोळे, दादा ढेकणे, उमेश कुळकर्णी, संकेत कदम, सायली बेर्डे, सुप्रिया रसाळ, संपदा तळेकर ''भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आमदार निरंजन डावखरे आगे, बढो हम आपके साथ है।'', अशा घोषणा देत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Winter Weather Forecast : उत्तर भारतातील थंड हवेची लाट पुन्हा वाढली, अजून गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT