कोकण

चिपळूण ः तलाठी न आल्याने चिपळुणात दाखले रखडले

CD

94267

तलाठी न आल्याने चिपळुणात दाखले रखडले
नागरिकांची दिवसभर प्रतीक्षा ; लाडकी योजनेमुळे गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ः राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. सोमवारी पहिल्या दिवशी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात महिला व कुटुंबप्रमुखांची गर्दी झाली होती; मात्र तलाठी न आल्यामुळे सायंकाळपर्यंत अनेकांना प्रतीक्षा करावी लागली.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरमहिना दीड हजार रुपये अर्थसाहाय्य केले जाणार असल्यामुळे त्याचा लाभ घेण्यासाठी महिलांमध्ये उत्साह आहे. १ ते १५ जुलै या कालावधीत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे. या प्रस्तावात वार्षिक उत्पन्नाचा दाखला तसेच अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक व फोटो सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी सोमवारी पहिल्या दिवसापासूनच विविध ठिकाणच्या तलाठी कार्यालयात गर्दी झाली होती.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयातही महिलांसह कुटुंबातील सदस्यांची उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी गर्दी होती. तलाठ्यांकडे चिपळूणसह कामथे गावचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते चिपळूण कार्यालयात उशिरापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे दुपारपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अनेक नागरिक कार्यालयाबाहेर भरपावसात ताटकळत उभे होते. या वेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तलाठी येताहेत एवढेच सांगितले जात होते. अखेर काहीजणं कंटाळून माघारी परतले; परंतु काही महिला व अन्य नागरिक कार्यालयाबाहेर सायंकाळी उशिरापर्यंत तलाठ्यांची वाट पाहात उभे होते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याशी संपर्क साधला. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयावर बहुतांशी नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे या कार्यालयातील तलाठ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे शहरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या कार्यालयात पूर्णवेळ तलाठी मिळण्याची मागणी तहसीलदारांकडे केली. या विषयी तहसीलदार कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

Latest Marathi News Live Update : पाषाण तलावातील मृत मासे प्रकरण! महापौरांचा दौरा, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीचे आदेश

गरोदर असूनही ‘राका’मध्ये दिसणार दीपिका पादुकोण करणार अ‍ॅक्शन सीन ! अभिनेत्रीची विशेष मेहनत

‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’मध्ये मराठमोळ्या श्वेता साकोडेची दमदार एन्ट्री; महाराष्ट्रीयन पदार्थांनी जिंकली परीक्षकांची मनं

Management Education: मॅनेजमेंट शिक्षणातील 'जेंडर गॅप': महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी बिझनेस स्कूल्स उचलत आहेत मोठी पावले

SCROLL FOR NEXT