कोकण

भाजपाचे राजापूर विधानसभा मतदार संघावर लक्ष

CD

भाजपचे राजापूर विधानसभा मतदार संघावर लक्ष
नीलेश राणेंचा आजपासून दौरा; पदाधिकारी, बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ : लोकसभा व कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने यश संपादन केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसह होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. त्यासाठी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे उद्यापासून (ता. ३) राजापूर दौऱ्यावर येत आहेत. भाजप पदाधिकारी, बूथ अध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
राजापूर नगर वाचनालय सभागृहात उद्या सकाळी १०.३० वा. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाले तर नुकत्याच झालेल्या कोकण पदवीधर मतदार संघातही भाजपने बाजी मारली असून निरंजन डावखरे हे निवडून आले. त्यामुळे आता राजापूर विधानसभा मतदार संघावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पक्षसंघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. माजी खासदार नीलेश राणे प्रथमच राजापूर दौऱ्यावर येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या वेळी राणे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, भाजप जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर आदी उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष भास्कर सुतार, पश्चिम मंडल अध्यक्ष सुरेश गुरव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT