कोकण

रत्नागिरी - जन्म, अधिवास दाखल्याची अट रद्द करा

CD

जन्म, अधिवास दाखल्याची
अट रद्द करण्याची मागणी
पालकमंत्री सामंत यांचे आदिती तटकरेंना पत्र
रत्नागिरी, ता. २ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत घालण्यात आलेल्या काही अटीशर्तींमुळे अडचणी येतात. त्यासाठी जन्मदाखला, अधिवास दाखला ही अट रद्द करा. अर्जदार महिलांना शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधारकार्डवर लाभ दिला जावा आणि या वर्षामध्ये विविध कामासाठी काढण्यात आलेले उत्पन्न दाखला त्यासाठी ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यात सध्या माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत अनेक महिला अर्ज करण्याच्या गडबडीत आहेत. काही अटींमुळे अर्ज भरताना गैरसोय होत आहे. या योजनेच्या अटीशर्तींमध्ये बदल केला नाही तर अनेक महिला लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ही बाब मजगांव सरपंच फैयाज मुकादम यांनी पालकमंत्री उदय सामंत व सिंधूरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांना निवेदनाद्वारे दाखवून दिली. या अटीमध्ये बदल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला याचा लाभ होणार आहे. किरण सामंत यांनी ही गोष्ट पालकमंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिली. या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा यासाठी अटीशर्तींमध्ये बदल करून तसे आदेश प्रशासनाला द्यावे, असे पत्र उद्योगमंत्री सामंत यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : मुख्यमंत्री मद्यप्राशन करून विधानसभेत पोहोचले? अकाली दलने शेअर केला व्हिडीओ, डोपिंग टेस्टची मागणी...

Thane: ठाण्यात पहिल्यांदाच डबल डेकर बस धावणार, कधीपासून प्रवाशांच्या सेवेत येणार?

Crime: जमिनीच्या वादातून तरुणाला संपवलं; नंतर मृतदेहाची जंगलात विल्हेवाट, ठाण्यातील प्रसिद्ध रीलस्टारला अटक, १२ वर्षांनी गूढ उलगडलं

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT