कोकण

पाट-मतकरीवाडीत रस्त्याला पावसामुळे तळ्याचे स्वरूप

CD

पाट-मतकरीवाडीत रस्त्याला
पावसामुळे तळ्याचे स्वरूप

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २ ः पाट-मतकरीवाडी येथील पाट-वेंगुर्ले या सागरी महामार्गावरून प्रवास करताना चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. या सागरी महामार्गाला पावसामुळे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने चालकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी बांधकामकड़ून पाट-मतकरीवाडी येथील सागरी महामार्गालगत चुकीच्या पद्धतीने गटाराची खोदाई केली होती. त्यामुळे चालकांना कसरत करावी लागत होती. ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली; मात्र यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे सध्या या महामार्गावर पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे महामार्गाची एक बाजू पूर्णपणे बंद झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूने ये-जा करावी लागत असून, यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल चालक व ग्रामस्थांनी केला असून, याबाबत तातडीने उपायोजना करण्याची मागणी केली जात आहे.
94388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

SCROLL FOR NEXT