कोकण

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्या

CD

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घ्या

वीरसिंग वसावे ः मुळदेत महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेपासून महिला वंचित राहू नये, यासाठी शासनाने सुटसुटीत आणि सहज उपलब्ध असे कागदपत्र उपलब्ध केले आहेत. त्याचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी आज मुळदे येथे केले. कुडाळ तालुक्यात ही योजना राबविणारी मुळदे ग्रामपंचायत पहिली ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामपंचायत मुळदे व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना गावात प्रभावी राबवून महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी विविध अर्ज व त्यासाठी आवश्यक कागदपत्र याविषयीचे मार्गदर्शन शिबिर आज ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजित केले होते. गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर झाले. सरपंच संध्या मुळदेकर, ‘उमेद’चे अधिकारी गणेश राठोड, उपसरपंच अपूर्वा पालव, हिर्लोक मुख्य सेविका मंगल सुतार, प्रभारी तलाठी विद्या अरदकर, पोलिसपाटील रामदास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरस्कर, सुशांत कदम, रुपाली चव्हाण, संतोषी चव्हाण, ओंकार केसरकर, वैशाली पालव, योगिता माळकर, प्रवीण पालव, बाबूराव जाधव, अमित पालव, मंगल म्हापणकर, सुहास जाधव, नागेश पालव, स्वप्नील म्हापणकर, संतोष जाधव, लक्ष्मण पालव, दीपिका पालव, ममता पालव, प्रिया पालव, आरती पालव, शमिका पालव, अनिल मासंग, उन्नती परब, नम्रता जाधव, लीला जाधव, पुंडलिक जाधव, प्रमिला गवई, साबाजी पालव, भिकाजी पालव, साक्षी पालव, श्रुतिका मेस्त्री, निखिल पवार, राखी माधव, स्वप्नील पालव, दत्तप्रसाद तवटे आदी उपस्थित होते.
गटविकास अधिकारी जगताप यांनी या योजनेचा प्रचार, प्रसार सगळीकडे मोठ्या प्रमाणात केला आहे. कुडाळ तालुक्यात ६८ ग्रामपंचायती असून, महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. कागदपत्रे सहज सोपी असल्याने हा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार आहे. नारी अॅपचा वापर करून महिला ऑनलाईन प्रक्रिया करू शकतात, असे स्पष्ट केले. पोलिसपाटील रामदास चव्हाण यांनी दुपारपर्यंत सुमारे दीडशे अधिक महिलांना योजनेच्या मोफत फॉर्मचे वाटप केल्याचे सांगितले. पोलिसपाटील चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी गोविंद तोरस्कर यांनी आभार मानले.
---
योजना राबवण्यात मुळदे अग्रेसर
तहसीलदार वसावे म्हणाले, ‘‘कुडाळ तालुक्यात ‘लाडकी बहीण’ योजना राबवणारी मुळदे ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. शासन निर्णयातील पहिल्या निकषांमध्ये बदल झाल्याने आता जमीन मर्यादा, वय, अधिवास या गोष्टी सादर कराव्या लागणार नाहीत. विशेष म्हणजे, या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, याबाबत शासनाने योग्य दखल घेतली आहे. या योजनेचा कालावधी ऑगस्ट अखेरपर्यंत वाढविल्यामुळे सर्वांनी लाभ घ्यावा. आशा सेविकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अन्य भागांतून, अन्य राज्यांतून महिलांसाठी जे पुरावा आहे, ते तिच्या पतीचे पुरावे चालू शकतात. विशेष म्हणजे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, यासाठी शासनाच्या या उपक्रमास सुरुवात होत आहे.’’
94810

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT