कोकण

पान एक-वैभववाडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

CD

वैभववाडीत तरुणाचा
संशयास्पद मृत्यू
वैभववाडी, ता. ६ : येथील रेल्वेस्थानकाजवळ व्हाळामध्ये तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. धीरजकुमार सुखदेव मिंज (वय २१, रा. छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील पॅनकार्ड आणि एटीएमवरून त्याची ओळख पटली असून, त्याच्याजवळ आयफोन सापडला आहे. हा प्रकार आज सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.
नापणे येथील एका महिलेला आज सकाळी वैभववाडी रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या लहान व्हाळामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, उपनिरीक्षक रोहित खोत, अभिजित तावडे, अजय बिलपे, जितेंद्र कोलते आदी घटनास्थळी पोहोचले. त्या व्यक्तीचा मृतदेह सडलेला स्थितीत होता. मृतदेहाशेजारी पोलिसांना आयफोन सापडला. त्याच्याकडील पॅनकार्ड आणि एटीएमवर धीरजकुमार असे नाव आहे. कागदपत्रांवर छत्तीसगड, निरश्रित परा, असा पत्ता आहे. तरुणाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. रेल्वेस्थानकाजवळ असूनही मृतदेह कुणालाच कसा दिसला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. हा तरुण नेमका वैभववाडीत कसा आला, त्याचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला की अन्य कारणामुळे, याचा तपास पोलिस करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT