कोकण

वैभववाडीत धुवाँधार पाऊस

CD

वैभववाडीत धुवाँधार पाऊस

रस्ते जलमय ः नापणेत घरे धोक्याच्या छायेखाली

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ६ ः तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेक मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली. काही घरे आणि शाळांच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. संततधारेमुळे एक घर कोसळले. जामदा पुलावरून पाणी वाहत असल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दुपारी बारा वाजल्यानंतर त्यामध्ये अधिकच वाढ झाली. पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. या पावसामुळे तालुक्यातील शुक आणि शांती नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील सोनाळी, कुसूर येथे ठिकठिकाणी पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वैभववाडी-फोंडा मार्गावर देखील तांबेवाडी, वाभवे, आर्चिणे येथे रस्ते पाण्याखाली होते. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील तिथवली येथील जामदा पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तिथवली येथे घर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिर आणि वाभवे येथील प्राथमिक शाळेला पाण्याने वेढले; मात्र आज रविवार असल्यामुळे अनर्थ टळला. वैभववाडी शहरात देखील ठिकठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. सांगुळवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. येथील रवींद्र पाटील यांच्या घरासभोवताली मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. शुक आणि शांती या दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे नापणे येथील काही घरे धोक्याच्या छायेखाली आहेत.
95523

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT