कोकण

बाह्ययंत्रणेद्वारे ४७७ पदभरती

CD

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ पदभरती

उदय सामंत ः टप्प्याटप्प्याने ५०९ पदांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्षनिहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या स्वाक्षरीने शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीतील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-अ ते क मधील नियमित ५०९ पदे वर्षनिहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यात येणार आहेत तसेच ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेकडून घेण्यात येतील. प्रथम, द्वितीय, तृत्तीय व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार आहेत. प्रथम वर्षाची पदे तत्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृत्तीय व चतुर्थ टप्प्यातील पदे प्रतिवर्षी निर्माण केली जातील. त्या पदांसाठीच्या वेतनाकरिता लेखाशिर्षही मंजूर केला गेल्यामुळे आवश्यक ती आर्थिक तरतूद केली गेली आहे. पुढील टप्प्यांच्या वेतनाची तरतूद संस्थेच्या प्रतिवर्षीच्या अंदाजपत्रकात केली जाईल. पुढील टप्प्यांच्या पदांचा समावेश प्रतिवर्षी अस्थायी पदांच्या मुदतवाढ प्रस्तावात करण्यात येणार आहे. बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या २७ एप्रिल २०२२ च्या शासननिर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे त्या शासननिर्णयात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

SCROLL FOR NEXT