कोकण

मनाच्या श्लोकांतून जीवन सुंदर

CD

-rat१०p१.jpg -
२४M९६०८५
रत्नागिरी : मनाचे श्लोक म्हणताना पूर्वा जोशी. सोबत ऋता पंडित आणि डॉ. निशिगंधा पोंक्षे.
---------

मनाच्या श्लोकांतून जीवन सुंदर

डॉ. निशिगंधा पोंक्षे ः सप्टेंबरमध्ये होणार पाठांतर स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० : मनाचे श्लोक आपल्या जीवनात किती महत्वाचे आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात याचा कसा फायदा होतो. मोठेपणी व्यक्तिमत्व विकासामध्ये खर्च करण्यापेक्षा लहानपणापासून पाठांतर केल्यास त्याचा योग्य वेळी योग्य अर्थ कळत जातो. लहानपणी योग्य बीज रूजवले तर त्याचे फळ मोठेपणी गोड मिळते अणि जीवन सुंदर बनते, असे सांगून स्पर्धेचे नियम, गुण कसे दिले जातात याची माहिती समर्थ भारत अभियानच्या संयोजिका डॉ. निशिगंधा पोंक्षे यांनी दिली.
स्पर्धेत प्रत्येकाने जिंकले पाहिजे असे नसून पालकांनी आपल्या मुलावर संस्कार करण्यासाठी आपल्या मुलाच्या जीवनाला योग्य आकार देण्यासाठी हे श्लोक पाठ करून घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले. समर्थ भारत अभियानातर्फे (पिंपरी चिंचवड) राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या संबंधी जोशी पाळंद येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळात मार्गदर्शन कार्यक्रमात डॉ. पोंक्षे बोलत होत्या.
ऋता पंडित यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेची प्राथमिक फेरी सप्टेंबरमध्ये शाळेतच घेतली जाईल. आंतरशालेय स्पर्धा ऑक्टोबरमध्ये, राज्यस्तरीय स्पर्धा जानेवारीमध्ये पुण्यात घेतली जाईल. मनाचे श्लोक कसे म्हणावेत याचे पालकांना प्रात्यक्षिक गेल्या वर्षीची विजेती पूर्वा जोशी हिने पाच श्लोक म्हणून दाखवले. सज्जनगड विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती तिने दिली. नावनोंदणी दीपाली आठवले आणि शीला जोशी यांनी केली. कार्यक्रमासाठी श्रुती दाते आणि स्नेहल भट यांनी सहकार्य केले. चित्पावन मंडळ व मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

FIFA World Cup 2026 : 16 वर्षांनंतर स्पेनची बाद फेरीत दमदार एन्ट्री! ऑस्ट्रियाला 3-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठलं

Latest Marathi Live Update: राष्ट्रीय कामाच्या नावाखाली शिक्षकांवर वाढता ताण; विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढू लागला; चार दिवसांच्या पावसाने नेमका काय बदल घडवला?

SCROLL FOR NEXT