कोकण

दमदार पावसाने शेतकरी लावणीत मग्न

CD

-rat११p१६.jpg -
२४M९६३३३
राजापूर ः लावणी केलेली भातशेती.
-rat११p१७.jpg ः
२४M९६३३४
भातलावणीसाठी सुरू असलेली चिखलणी.
-----------------

दमदार पावसाने शेतकरी लावणी कामात मग्न

राजापूर तालुका ; बाजारपेठेत मंदी, ६० टक्के लावणी पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ११ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने सातत्य राखल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे लावणीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध असल्याने लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे. तालुक्यातील सुमारे साठ टक्के लावणीचे कामे पूर्ण झाले आहे. शेतीच्या कामांमध्ये शेतकरी गुंतल्याचा परिणाम येथील बाजारपेठेतील खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर होऊन ते काहीसे मंदावले आहेत.
यावर्षी पावसाने दमदारपणे आगमन केले होते; मात्र त्यानंतर मध्यंतरी दडी मारली असली तरी भातपेरणीच्या कामांसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध झाल्याने पेरणीची कामे वेळेत पूर्ण झाली होती. मधल्या काळात पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्‍यांनी नांगरणीची कामेही वेळेत झाली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे लावणीची कामे वेगाने सुरू आहेत. तालुक्यातील सुमारे साठ टक्के भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. भातलावणीच्या कामांसाठी शेतकऱ्‍यांची शेतामधील लगबग वाढल्याने बाजारामध्ये खेरदीसाठी येणाऱ्या लोकांची वर्दळ मंदावली आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला आहे.
-----------
चौकट
गतवर्षीपेक्षा दोनशे मिमी जादा पाऊस

आजपर्यंत तालुक्यामध्ये यावर्षी १३४३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवसापर्यंत १११२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी दोनशे मिमी जादा अन् समाधानकारक पाऊस पडल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT