ganpati special train booking full 
कोकण

Ganpati special train booking: गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, चाकरमान्यांचा हिरमोड, तिकीट बुकिंगमध्ये गैरप्रकार?

Konkan Railway Ganpati Special Trains 2024: गणेशोत्सवासाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल ; २०२ विशेष गाड्या, आरक्षण करणाऱ्यांना रिग्रेटचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

खेड, ता. २३ ः गणेशोत्सवाकरिता कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे २०२ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या रेल्वेगाड्यांचे आरक्षण रविवारी सकाळपासून सुरू झाले; मात्र काही वेळातच आरक्षण हाऊसफुल्ल झाल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता आला नाही. आरक्षण करणाऱ्यांना गाड्या रिग्रेट झाल्याचा संदेश आला.

konkan railway ganpati special train 2024 schedule

कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत असतो. यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी सुटीचे नियोजन करण्यासही आतापासून सुरवात केली आहे. त्याचबरोबर बप्पाच्या दर्शनासाठी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेचे बुकींग हे त्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट असते. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यरेल्वेने कोकणासाठी २०२ गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करून चाकरमान्यांना चांगलाच दिलासा दिला.

गणेशोत्सवासाठी नियोजन केलेल्या २०२ विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले. आरक्षण सुरू होताच काही वेळातच ''त्या'' गाड्या फुल्ल झाल्याचे निदर्शनास आले. मागील व पुढील तारखेची तिकिटे काढताना ''रिग्रेट'' असा संदेश झळकत होता. त्यामुळे तिकीट आरक्षणात गैरप्रकार होत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

एलटीटी - कुडाळ गणपती विशेष एक्स्प्रेस ४ सप्टेंबर, ५ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबरला रिग्रेट दाखवत आहे. एलटीटी-कुडाळ गणपती विशेष ४ आणि ७ सप्टेंबर तर सीएसएमटी- सावंतवाडी गणपती विशेष ५ सप्टेंबरच्या गाड्या रिग्रेट दाखवत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे.

रेल्वेगाड्याचे नियोजन करा

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. विशेष रेल्वेचे अवघ्या काही तासात आरक्षण फुल्ल झाले. याचा विचार प्रशासनाने करून आणखी रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी चाकरमान्यांच्यातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT