कोकण

‘महसूल पंधरावडा’ उपक्रमाचे जिल्ह्यात भाजपकडून कौतुक

CD

01540
‘महसूल पंधरावडा’ उपक्रमाचे
जिल्ह्यात भाजपकडून कौतुक

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः राज्यात आजपासून होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार राजन तेलीही उपस्थित होते.
महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य व सुलभ लाभ घेता यावा, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा, यासाठी लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने गतवर्षी आज महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीच्या महसूल सप्ताहादरम्यान राबविलेले विविध कार्यक्रम आणि शिबिरे यांचे यशस्वी आयोजन आणि मिळालेला जनप्रतिसाद विचारात घेऊन, महसूल दिनानिमित्त अधिकाधिक लोकाभिमुख कार्यक्रम राबविणे शक्य व्हावे यासाठी यावर्षीही ‘महसूल पंधरवडा-२०२४’ आयोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासनाला सहाय्यभूत ठरेल, असे काम करतील असे अभिवचन सावंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

IND A vs SL A: त्याच्यासाठी चॅलेंज असणारच... वैभव सूर्यवंशीच्या फॉर्मवर फायनल सामन्यापूर्वी तिलक वर्मा नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT