07313
गोकुळाष्टमी उत्सव
देवगडमध्ये उत्साहात
देवगड, ता. २७ः तालुक्यात सोमवारी (ता. २६) अष्टमीनिमित्त श्री गोकुळाचे पूजन झाले. येथील किल्ला तसेच जगतापवाडीत पारंपरिक पध्दतीने गोकुळ आणून उत्सव साजरा करण्यात आला. भक्तगण उत्साहाने सहभागी झाले होते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म झाल्यावर किल्ला भागात गोकुळाचे पूजन होते. येथील जगतापवाडीमध्येही अशीच परंपरा आहे. यासाठी सायंकाळी उशिरा चित्रशाळेमधून श्री कृष्णाची मूर्ती पूजनासाठी नेण्यात येते. सोमवारी सायंकाळी मूर्ती नेताना उद्योजक नंदकुमार घाटे आणि दत्तात्रय पारकर यांनी मूर्तीपूजन केले. यावेळी भक्तांचा उत्साह वाढला होता. ढोलताशांच्या गजरात उत्साहाला उधाण आले होते. यावेळी लहान मुलांचा मेळा सादर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.