कोकण

आठ महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळतो हे दुर्दैवी ः भोसले

CD

07328

आठ महिन्यांपूर्वीचा पुतळा
कोसळतो हे दुर्दैवी ः भोसले

चौकशी करा; दोषींवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २७ : मालवण-राजकोट येथे अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला, ही दुर्दैवी बाब आहे. याबाबत संबंधित शासकीय विभागाने योग्य चौकशी करून कुणी दोषी असल्यास कारवाई करावी, अशी मागणी शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी केली आहे.
श्री. भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण होण्यासाठी राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, ही शिवप्रेमींसाठी नक्कीच आनंदाची, अभिमानाची बाब होती. मात्र, अवघ्या आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळल्याने त्याच्या दर्जाविषयी शिवप्रेमींमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे घडल्या प्रकाराची काटेकोरपणे चौकशी व्हायलाच हवी. शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांची जिल्ह्यात ठिकठिकाणी स्मारके आहेत. एखादी घटना घडल्यानंतर सतर्कता दाखविण्यापेक्षा सद्यास्थितीत जिल्ह्यात असणारी महापुरुषांची सर्व स्मारके सुस्थितीत आहेत का, याचीही तपासणी संबंधित शासकीय विभागांनी करावी. तसेच यापुढे कोणत्याही महापुरुषाचे स्मारक उभारताना दर्जा, जागा आदींसह तांत्रिक बाबींचीही तपासणी करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave: पुणे परिसरात उष्णतेचा तडाखा; लोहगावचा पारा ४२ अंशांवर, तापमान आणखी वाढणार, अंगाची लाहीलाही..

मृण्मयी देशपांडेचं चालतं फिरतं घर पाहिलत का? आता महिनाभर तिथेच राहणार, Viral Video

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

Latest Marathi News Live Update: राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

SCROLL FOR NEXT