कोकण

राजकोटमधील दुर्घटनेचा नौदल बनविणार अहवाल

CD

राजकोटमधील दुर्घटनेचा
नौदल बनविणार अहवाल

अधिकाऱ्यांकडून पाहणी; केसरकरांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सरकारसह सर्वच प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. हा पुतळा उभारण्यात भारतीय नौदलाने पुढाकार घेतला असल्याने नौदलाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच आज सकाळी त्यांच्या अधिकाऱ्यांनी राजकोट येथे येत कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. याबाबत लवकरच एक स्वतंत्र अहवाल तयार करण्यात येणार असून, हा अहवाल नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नौदल दिनाच्या निमित्ताने भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण येथे उभारण्यात यावा, अशी भारतीय नौदलाची योजना होती. या योजनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नौदलाने सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक राजकोट येथे तब्बल पाच कोटी रुपये खर्चून राजकोट किल्ल्याची डागडुजी केली आणि त्यात १५ फूट उंच चबुतऱ्यावर २८ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती.
पुतळा उभारण्याच्या कामात शासनाशी समन्वयक म्हणून लेफ्टनंट कमांडर अक्षय पाटील व कमांडर सुशील कुमार राय यांनी काम पाहिले होते. याच अधिकाऱ्यांनी आज राजकोट येथे येत कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. या पाहणीची माध्यमांपासून गुप्तता पाळण्यात आली होती. राजकोट येथील कोसळलेल्या शिवपुतळ्याची पाहणी केल्यानंतर नौदल अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय येथे मंत्री दीपक केसरकर यांच्याशी एकंदरीत परिस्थितीबाबत बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. घटनेच्या पाहणीअंती वरिष्ठांना त्याबाबत अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT