चार महिन्यांत जिल्ह्यात
सर्पदंशाचा एक बळी
२४४ जणांना सर्पदंश; वेळेत मिळाले उपचार
रत्नागिरी, ता. २७ : जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढताना दिसत आहेत. गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात २४४ जणांना सर्पदंश झाला. यातील सर्वाधिक घटना ग्रामीण भागातील आहेत. रात्री जमिनीवर झोपलेल्या अनेकांना आणि शेतीची कामे करणाऱ्यांना साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. वेळीच उपचार झाल्याने अनेकांना वाचवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे; मात्र मे महिन्यात एका मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नोंद आहे.
सर्पदंशाबाबत आरोग्य विभागाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्प, विंचूदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते; मात्र सर्पदंश झाल्यावर त्या रुग्णाने घाबरून जाऊ नये. वेळीच व योग्य उपचार झाल्यास जीव वाचतो. अशा रुग्णाला झोपू देऊ नये. शक्यतो दंशाचा भाग खालच्या बाजूला राहील याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
पावसाचे पाणी बिळात गेल्याने सरपटणारे अनेक प्राणी बाहेर निघतात. हाच काळ सापांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे सुद्धा साप बाहेर फिरतात. मागील दोन महिन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १३५ जणांना सर्पदंश झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे या दिवसांत जास्त सर्पदंश होतात. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे सर्पदंश व विंचूदंश यावर मोफत उपचार केला जातो. येथे अॅन्टी स्नेक व्हेनम उपलब्ध आहे. गावठी उपचार करण्यापेक्षा थेट रुग्णालयात येऊन उपचार घेतला तर हमखास जीव वाचवता येतो. गेल्या चार महिन्यांमध्ये जिल्ह्यात २४४ जणांना सर्पदंश झाला तर एकाचा मृत्यू झाल्याची आरोग्य विभागत नोंद आहे. विंचूसुद्धा पावसाळ्यात दिवसांमध्ये बिळाबाहेर पडतात. रात्री ते खाद्य शोधण्यासाठी भटकतात. त्यांना कुणाचा स्पर्श झाल्यास ते दंश करतात. विंचवाचे विष अतिशय जहाल असते.
चौकट
प्रथमोपचार काय कराल ?
साप चावला तर सापाने दंश केलेली जागा स्वच्छ पाण्याने धुवून काढावी. दंश झालेल्या व्यक्तीला हालचाल करू देऊ नये. त्यांना बसलेल्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.