कोकण

दुर्घटनेबाबत चौकशी समिती नेमा

CD

०७३५०
दुर्घटनेबाबत चौकशी समिती नेमा

अॅड. सुहास सावंत ः मराठा महासंघातर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ ः मालवण-राजकोट परिसरात उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्राला काळिमा लावणारी ही घटना आहे. या घटनेचा मराठा महासंघामार्फत निषेध करण्यात येत आहे, असे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत यांनी नमूद करत या घटनेच्या चौकशीसाठी शिल्पकलेतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच आयआयटी मुंबईमधील धातूशास्त्र तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती तयार करावी. शासनाने अशी समिती न केल्यास याबाबत मराठा महासंघ, सिंधुदुर्ग उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
श्री. सावंत यांनी म्हटले आहे की, या घटनेनंतर घडलेल्या शासकीय हालचालींवरून काही प्रश्नचिन्हे शासनाच्या कारभाराबाबत निर्माण होत आहेत. घटना घडण्यापूर्वी मालवण येथील सहाय्यक अभियंता श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या कार्यालयातील पत्राने कमांडर, अभिषेक कारभारी, एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर यांना पत्र लिहून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यात त्यांनी या पुतळ्याची डागडुजी जूनमध्ये केल्याचे नमूद केले आहे. डागडुजी करूनही हा पुतळा विद्रुप दिसत आहे. पुतळ्याचे नटबोल्ट निघाल्याचे नमूद केले आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना पुतळ्याच्या स्थापत्याबाबत जर शंका होती, तर त्यांनी त्यांच्या स्तरावर संरक्षणाबाबत तात्पुरती उपाययोजना का केली नाही? जूनमध्ये पुतळ्याची कोणती डागडुजी केली? याचा तपशील जनतेला समजणे गरजेचे आहे.
सोमवारी (ता. २६) पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर तातडीने जनतेची दिशाभूल करण्यासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी १ सार्वजनिक बांधकामचे अधिकारी अजित पाटील यांनी पुतळा उभारणारे जयदीप पाटील व ठेकेदार चेतन पाटील यांच्याविरुद्ध मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची परिभाषा पाहता, असे दिसून येते की, पुतळा बांधणी व उभारण्याच्यावेळी योग्य ती काळजी घेतलेली नाही. अशी काळजी न घेतल्याने कोणाचाही मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव पुतळा उभारणाऱ्यांना होती व आहे. अशी परिस्थिती होती, तर पुतळ्याच्या जूनमध्ये डागडुजीला बांधकाम अधिकाऱ्यांनी परवानगी कोणत्या कारणाने व अधिकारामध्ये दिली? यावरून हा पुतळा कोणत्याही तांत्रिक कारणामुळे कोसळला नसल्याचे स्पष्ट होते. पुतळा कोसळण्यामागे शासनाचा अक्ष्यम्य हलगर्जीपणा आहे, असे अॅड. सावंत यांनी म्हटले आहे.
.............
पंतप्रधानांचे लक्ष वेधणार
मराठा महासंघाची मागणी अशी आहे की, पुतळा उभारण्याबाबतची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत. सिंधुदुर्ग पोलिसांनी चौकशीकामी धातुशास्त्र तज्ज्ञ व तज्ज्ञ शिल्पकार यांची तपासकामी मदत घ्यावी. मराठा महासंघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ही बाब लक्षात आणून देण्यात येणार आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा स्पर्श झाल्यामुळे जेथे पुतळा उभारला होता, ती जागा अपवित्र झाली आहे. म्हणून या जागेवर दुधाचा अभिषेक करण्यात येणार आहे. शासनाने याकामी चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी नेमून त्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजमधील शिल्पकलेतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच आयआयटी मुंबईमधील धातूशास्त्र तज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी तयार करावी. शासनाने अशी कमिटी न केल्यास मराठा महासंघ उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : खंडणीसाठी कानपूरच्या व्यावसायिकाचे अपहरण; पाच आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT