Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Should India Fast-Track Vaibhav Sooryavanshi? IPL 2026 मध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आता भारतीय संघाच्या दारात पोहोचला आहे. फक्त १५ वर्षांचा असलेला हा खेळाडू अनुभवी गोलंदाजांनाही सहजतेने खेळताना दिसत आहे.
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 expectations and goals

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 expectations and goals

esakal

Updated on

Aaron Finch opinion on Vaibhav Sooryavanshi India debut : वैभव सूर्यवंशीने मागील दीड वर्षात जगातील क्रिकेटप्रेमींना त्याची दखल घेण्यास भाग पाडले आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या कमी वयातील फलंदाजापासून ते १९ वर्षांखालील वर्ल्ड कप फायनलमधील त्याची १७८ धावांची विश्वविक्रमी कामगिरी, त्याने केली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्येही तो दमदार खेळतोय आणि त्यामुळेच आता अजिबात वेळ न घालवता, त्याला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. जूनमध्ये भारतीय संघ लंडन दौऱ्यावर आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे आणि त्यात वैभवची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com