07374
राजकोटप्रकरणी ठाकरे गटातर्फे
सिंधुदुर्गनगरीत निषेध आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २७ ः मालवण-राजकोट येथे आठ महिन्यांपूर्वी अनावरण केलेला शिवरायांचा पुतळा सोमवारी कोसळला. याचे पडसाद जिल्हाभर उमटले. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारला जबाबदार धरत आज निषेध आंदोलन छेडले. ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अवधूत मालणकर, छोटू पारकर, सुनील जाधव, सुशील निबरे, नागेश ओरसकर, योगेश तावडे, सूर्यकांत बालम, महादेव परब यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला ही घटना शिवप्रेमींच्या मनात वेदना निर्माण करणारी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र शासनाचा तसेच संबंधित यंत्रणेचा आज ठाकरे शिवसेनेच्यावतीने आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त केला. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.