तरुणीवर अत्याचारप्रकरणी तिघेजण ताब्यात
उदय सामंत : सखोल चौकशी करण्याचे आदेश
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरीतील चंपक मैदानावर नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण अतिशय हीन आणि संतापजनक आहे. चीड आणणारा हा प्रकार असल्याने याची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शासन करा, असे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिस तपास करत असून, तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री सामंत येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर काल सकाळी चंपक मैदान येथे अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. संतप्त जमावाने रात्री जिल्हा रुग्णालयात निदर्शने केली. तसेच रस्तारोको देखील केला. जमावाला आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. त्यावर पालकमंत्री सामंत म्हणाले, आज जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ महिला पोलिस अधिकारी उपस्थित होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना वेगाने तपास करण्याच्या, आरोपींचा शोध घ्या, अशा सक्त सूचना केल्या आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशील असून, पीडित युवतीने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. पीडित युवतीने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटीव्हीचे चार फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणात असलेल्यांची गय केली जाणार नाही, असे सामंत म्हणाले.
------------
चौकट
पुतळा पडला ही घटना दुर्दैवी
सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर बोलणे योग्य ठरेल, सविस्तर चौकशी केली जावी, ही आम्हा सर्वांची मागणी आहे, असे सामंत यांनी सांगितले. प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे, हे निव्वळ राजकारण आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांना दोष देणे योग्य नाही. तसे करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.