

Gautam Gambhir
Sakal
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शानाखाली भारतीय संघाने गेल्या दीड वर्षात २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप २०२५ आणि २०२६ टी२० ट्रॉफी या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या. भारतीय संघाची (Team India) मर्यादीत षटकांमधील कामगिरी चांगली झाली असली, तरी कसोटीत मात्र भारतीय संघाला काही मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले.
त्याच गेल्या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) या दोघांनीही अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याशिवाय संघात अचानक झालेले मोठे बदल यामुळे गौतम गंभीर सातत्याने टीकेचा धनी ठरत आला आहे.
मात्र आता गंभीरचा माजी संघसहकारी मुनाफ पटेल (Munaf Patel) याने त्याची पाठराखण केली आहे. मुनाफच्या मते गंभीर हा खरा व्यक्ती आहे, त्यामुळे अनेक लोकांना तो आवडत नाही.