rat२९p१७.jpg -
P२४N०७८११
रत्नागिरी ः जिल्हा तेली समाजसेवा संघाच्यावतीने गुहागर तालुका तेली सेवासंघाचे यथोच्छित सन्मान करताना.
वधू-वरांसाठी तेली समाजाची वेबसाईट
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २९ : विवाहासाठी अनुरूप वधू किंवा वर यांची निवड काळजीचा विषय बनत आहे. शिक्षणामुळे मुले-मुली भवितव्याबद्दल जागरूकपणे विचार करतात. त्यांना भविष्यातील स्वप्नांना साजेसा, आपल्या योग्यतेचा, आवडीनुरूप जोडीदार हवा असतो. साथीदार शोधण्याच्या या प्रयत्नांना घरबसल्या बळ देण्यासाठी गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाने वेबसाईट सुरू केली आहे.
वधू-वरांचे विवाह कमीत कमी वेळेत व कमी खर्चात होण्यासाठी गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाने www.telijodidar.com हे विवाहविषयक वेबपोर्टल व telijodidar अॅप सर्वांसाठी खुले केले आहे. सदर वेबपोर्टल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या ठिकाणी उपवर डाटाबेसच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.
या वेबपोर्टल व अॅपचे डिझाईन संस्थेचे सदस्य विलास किर्वे (वरवेली), ग्राफिक्स डिझाईन प्रवीण रहाटे (गुहागर), लेखन दिनेश खेडेकर (अडूर), अन्य तांत्रिक साहाय्य प्रशांत रहाटे (गुहागर), ऋषिकेश रहाटे (गुहागर), रसिका नाचणकर (रत्नागिरी), अस्मिता झगडे (अडूर), शुभाली सकपाळ (राजापूर) या सदस्यांनी केले. या वेळी गुहागर तालुका बेसिक कमिटी, युवा समिती, महिला समिती तसेच रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघाचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.