07958
राष्ट्रीय क्रीडादिनी कासार्डेत
मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
तळेरे, ता. २९ ः मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा जनजागृती रॅली काढून आणि प्रशालेतील पाचवी ते नववीतील ३०० हून अधिक मुलींना स्वसंरक्षणार्थ कराटे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यानिमित्त प्रशालेत २६ ऑगस्टपासून लगोरी, दोरीउडी, रस्सीखेच, कॅरम, लंगडी, व्हॉलिबॉल, कॅरम यांसारख्या विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. कासार्डे विद्यालयात मोफत कराटे प्रशिक्षणाचा हा उपक्रम गेली २७ वर्षे सुरू आहे. हा उपक्रम क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मुलांनी प्रात्यक्षिके सादर केली. या उपक्रमाचे स्थानिक व्यवस्था समिती कार्याध्यक्ष संजय पाताडे, शाळा समिती अध्यक्ष अरविंद कुडतरकर यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका बी. बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस. व्ही. राणे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध खेळांच्या स्पर्धेसाठी मुख्याध्यापिका बिसुरे, पर्यवेक्षक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक मारकड यांना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी शिरस यांनी विशेष कौतुक करून विविध स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.