‘वांद्रे- मडगाव’ला हिरवा झेंडा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३० ः वसई मार्गे थेट कोकणात येणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी (ता. २९) दुपारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही गाडी बोरीवली रेल्वे स्थानकातून मडगावकडे रवाना झाली.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह बोरिवली, दहिसर, मागाठणे येथील स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत वांद्रे ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गाडी कोकणच्या दिशेने रवाना झाली. पश्चिम उपनगरातून कोकणात जाणाऱ्या या पहिल्या गाडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबईतील कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी गोयल यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
-------
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.