कोकण

जैसलमेर किल्ला

CD

(अनगड कोकणपासून दूर वाळूत ...............लोगो)
(२४ ऑगस्ट टुडे ३)

रावळ जैसेल याने ११५६ ला जैसलमेर हा किल्ला वसवला. त्याच्याच नावाने किल्ला ओळखला जातो. किल्ल्याला एकूण ९९ मोठे बुरूज आहेत. किल्ल्यात ३ स्टारपासून ५ स्टार अशी ७० तरी हॉटेल आहेत. किल्ला मारवाडमध्ये असल्यामुळे तेथील जर्दपिवळा रंग असलेला दगड वापरला गेला आहे. त्यामुळे तो सोन्यासारखो चमकतो म्हणून त्याला गोल्डन फोर्ट म्हणतात आणि शहराला गोल्डन सिटी...!

rat३p५.jpg -
P२४N०८०५४
- पराग वडके

parag.vadake@gmail.com

---
जैसलमेर किल्ला

जैसलमेर हा किल्ला त्रिकुट नावाच्या एका मोठ्या पहाडावर वसवलेला असून, लांबी-रूंदी ५०० बाय २५० मीटर आहे आणि उंची ८५ मीटर. राजस्थानातील एक नंबर किल्ला चितोडगड आणि हा दोन नंबर. आत वस्ती आहे, बाहेर पण दुकाने खेटून उभी आहेत.
या किल्ल्यातून आणि गावातून चीन, अफगाणिस्तान ते पार मंगोलियापर्यंत व्यापार चालत असे. या किल्ल्याच्या पायथ्याशी कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर पट्ट्यातील....टमटम...दिसतात. त्या आपल्याला कधी अलसा! असं विचारात आत किल्ल्यात घेऊन जातात. संपूर्ण किल्ला एक भूलभुलैया आहे. तुम्ही ग्रुप सोडला तर थेट खाली जाऊन बसजवळ वाट बघण्याशिवाय इलाज नाही. आत राजा का महाल, रानी का महल तसेच जैन मंदिरे आहेत. अतिशय उत्कृष्ट कलाकुसर बघण्यासारखी आहे. येथे गेलात तर तेथील दुकानांत हाबू नावाचा दगड विकत मिळतो तो घ्यायला विसरू नका. अतिशय आयुर्वेदिक तत्त्वासाठी तो प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे मालक स्वतःला चंद्रवंशीय व कृष्णाचे वंशज समजतात. भटी राजपूत म्हणून त्यांना ओळखले जाते.
किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम ड्राय मेसनरी पद्धतीचे म्हणजे जलपदार्थ न वापरता शिसे, चुना वगैरे वापरून केलेले आणि मेल फिमेल लॉकिंग पद्धतीचे आहे. किल्ल्यात गाजमहाल पाहण्यासारखा आहे. जेथून राजा सर्व कारभार पाहत असे. किल्ला उतरताना सतीयोंकी सिधीया पाहायला विसरू नका. तिथे ज्या स्त्रिया सती गेल्या त्यांचे हाथ दगडावर कोरलेले दिसतात. महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच दुर्गावर ते दिसतात. महाराष्ट्र आणि राजस्थानवीर योद्ध्यांनी भरलेले राज्य आहे. ते त्या हातांच्या संख्येवरून सहज लक्षात येते. आम्ही हळूच भारावून किल्ला सोडत असतो. वाळवंटातील अजून एक संध्याकाळ झालेली असते. गोल्डन फोर्ट, फ्लड लाईटने उजळलेला असतो. पिवळाजर्द दगड महाराष्ट्राला हळूच अलविदा करत असतो. हा किल्ला नक्कीच पाहण्यासारखा असाच आहे...!

(लेखक दऱ्याखोऱ्यांतून भटकंती करणारा सामाजिक कार्यकर्ता आहे.)
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT