शिवसेना ठाकरे गटाकडूनच
नियोजनबद्ध राडा ः तावडे
पराभव दिसत असल्याने कटकारस्थान
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३० ः मालवण-राजकोट येथे ठाकरे शिवसेनेने नियोजनबद्ध राडा घडवून आणला असून त्यांना पराभव दिसत असल्याने असे प्रकार त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष अध्यक्षा प्राची तावडे यांनी पत्रकातून केला.
सौ. तावडे यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना पराभवाची चाहुल लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता नियोजनबद्ध राडा घडवून आणण्याचे कटकारस्थान त्यांच्याकडून सुरू आहे. जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून झपाट्याने विकास होत आहे. परंतु, हा विकास ठाकरे गटाला बघवत नाही. लोकसभेत त्यांना जिल्ह्यात पराभव पत्कारावा लागला. आता विधानसभेतही त्यांना चारीमुंड्या चीत केले जाणार आहे. त्यांचा पराभव अटळ आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आमचे नेते खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका करण्याचे काम ते करीत आहेत. मालवणमध्ये झालेल्या राड्याला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्तेच जबाबदार आहेत. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी करून डिवचण्याचा प्रयत्न केला. हा नियोजनबद्ध डाव होता. त्यांच्यामुळेच राडा झाला, अशी टीका सौ. तावडे यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्यभर माथे भडकविणारे राजकारण सुरू आहे. ते लोण आता मालवणपर्यंत येवून पोहोचले आहे. मात्र, सिंधुदुर्गातील जनता त्यांना थारा देणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे. महाराजांच्या पुतळ्याचा आधार घेवून गलिच्छ राजकारण त्यांच्याकडुन सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी पत्रकातून केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.