कोकण

राजकोटावर शिवरायांचे साजेसे स्मारक

CD

०८१४७

राजकोटवर शिवरायांचे साजेसे स्मारक
उपमुख्यमंत्री अजित पवार : पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० ः राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावाला साजेसे स्मारक उभारण्याचा निर्णय झाला आहे. पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी खासगी जमीन मालक जमिनी देण्यास तयार असून त्या जागा घेण्याचा विचार सुरू असल्याचेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, हेही होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, सिंहासनावर बसलेले पुतळे, उभे असलेले पुतळे उभारले आहेत. सर्वजण त्यांना आदराने नतमस्तक होतात आणि त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत असते. राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. महाराजांच्या नावाला साजेसे असे स्मारक येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय होत असतानाच किल्ल्याच्या परिसरातील खासगी जमिनी तेथील विकासासाठी घेण्याचा विचार झाला आहे. राजकोट किल्ला येथील पूर्ण अभ्यास करून उत्तम प्रतीचा पुतळा उभारला जाणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्यात आले आहे.’’
ते म्हणाले, ‘‘नौदल दिनाच्या वेळी या पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा येथे सर्वकाही व्यवस्थित होते. त्यानंतर जे काही घडले त्याची अत्यंत खोलात जाऊन चौकशी केली जाणार आहे. पुतळ्याचे ज्यांनी काम केले त्या व्यक्ती अजूनही सापडले नाहीत; परंतु ते पळून पळून कुठे जाणार, महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाहीत ना, त्यांना शोधून त्यांच्याकडून प्रकरणाची शहानिशा केली जाईल. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अनुभवी रचना सल्लागार, स्ट्रक्चरल ऑडिटर हे सुद्धा या ठिकाणी भेट देतील. ते सुद्धा आपली मते तपास यंत्रणेला देतील. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मी या ठिकाणी येऊन प्रशासनाला कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. याउलट या दुर्घटनेबद्दल सुरुवातीपासूनची माहिती जाणून घेतली. प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याबाबतचा सर्वांशी बोलून निर्णय घेतील. जे ठरविले जाईल ते अंतिम असेल.’’
राजकोट किल्ल्यावर नुकत्याच झालेल्या राजकीय राड्यावरही अजित पवारांनी भाष्य करत प्रत्येक नेत्याने, कार्यकर्त्याने तारतम्य ठेवायला हवे. महाराष्ट्राची संस्कृती जोपासली पाहिजे, असे सांगितले.
जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम सहायक अभियंता अजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अबीद नाईक, काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, सुरेश गवस, नाथ मालोंडकर, बबन शिंदे, राजा गावकर, किसन मांजरेकर, एम. के. गावडे, प्रज्ञा परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट
अधिकाऱ्‍यांकडून घेतली
सविस्तर माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अधिकारी वर्गाकडे पुतळा दुर्घटनेची चौकशी केली. यावेळी पवार यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दूर ठेवत अधिकाऱ्‍यांकडून राजकोट किल्‍ल्याच्या बांधकामाची, तिथे शिवरायांचा पुतळा उभारण्या पर्यंत एकंदर सर्व प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. तब्बल अर्धा तास पवार यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

‘1 किलो सोयाबीन काढून दाखवा, क्विंटलभर काजू-बदाम घेऊन जा’; सोयाबीनच्या नुकसानीवर शेतकऱ्याचा संताप |

SCROLL FOR NEXT