कोकण

वृक्षारोपणासाठी सरपंच संघटनेचा पुढाकार

CD

-ratchl३०४.jpg-
OP२४N०८१३४
चिपळूण ः रिक्टोली येथे वृक्ष लागवड करताना सरपंच दयानंद शिंदे.
-------------

वृक्षारोपणासाठी सरपंच संघटनेचा पुढाकार

रिक्टोलीतून सुरवात ; तीन हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः तालुक्यातील वृक्ष लागवडीला गती मिळण्यासाठी चिपळूण तालुका सरपंच संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेच्या माध्यमातून गावोगावी वृक्ष लावगड करून त्याची जोपासना करण्याचा निर्धार करण्यात आला. मोहिमेची सुरवात तालुक्यातील रिक्टोली येथे करण्यात आली. तालुक्यातील १३० सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या माध्यमातून सुमारे ३ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्याचे ध्येय सरपंच संघटनेने ठेवले आहे.
काही दिवसांपूर्वी चिपळूण पंचायत समितीत चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक झाली होती. बैठकीत संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करताना काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांच्या नावाने प्रत्येकी एक झाड लावण्यात यावे तसेच ते रोप जगवण्याची जबाबदारी संबंधित सरपंच, सदस्यांनी घेण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांनी केले होते. त्यानुसार तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत पहिली वृक्ष लागवड रिक्टोली येथे करण्यात आली. रिक्टोलीचे सरपंच दयानंद शिंदे, सदस्य, पोलिस पाटील व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. गेल्या काही दिवसात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोपांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांची निगा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी राखणार आहेत. दरवर्षी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते.
--------
चौकट
गतवर्षी ५० हजार रोपांची रूजवात

गतवर्षी नाम फाउंडेशन, टीडब्ल्यूजे व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली होती. या वेळी सरपंच संघटनेने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेत त्याचे जतन करण्याचा निर्धार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT