कोकण

-पुतळा कोसळल्याच्या घटनेचा आरपीआयकडून निषेध

CD

-rat३०p१८.jpg-
P२४N०८०७२
मंडणगड : तहसीलदार संजय गुरव यांच्याकडे निवेदन देताना आरपीआयचे कार्यकर्ते.
--------------
पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध

आरपीआयकडून चौकशीची मागणी; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३० ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मंडणगड तालुका शाखेच्यावतीने राजकोट किल्ल्यातील पुतळा कोसळण्याचा घटनेचा निषेध केला. आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन प्रभारी तहसीलदार संजय गुरव यांना देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, ही बाब गंभीर असून यामुळे शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. प्रथम या घटनेस कारणीभूत असलेल्या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी, मूर्तिकार, स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्यासह केवळ राजकीय फायद्यासाठी अतिघाईने मोठा इव्हेन्ट घडवण्याच्यादृष्टीने पुतळ्याची स्थापना करणाऱ्या महाराष्ट्र सरकारसह सर्व संबंधितांचा जाहीर निषेध करतो, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शंका असून सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष राजेश साळवी, माजी अध्यक्ष राजेश गमरे, राजेश खैरे, रणजित यादव, दिनेश राऊत, प्रतीक गमरे, सागर खैरे आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT