08222
कवी कृष्णा देवळींच्या
पुस्तिकेचे आज प्रकाशन
ओटवणे, ता. ३० ः येथील प्रसिद्ध कवी कृष्णा देवळी यांनी ‘श्री सार्थ रामरक्षा’ हे संस्कृत भाषेतील स्तोत्र मराठी भाषेत ओवीबद्ध केले आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन उद्या (ता.३१) सायंकाळी ५ वाजता ओटवणे रवळनाथ मंदिराच्या सभा मंडपात करण्यात येणार आहे.
‘श्री सार्थ रामरक्षा’ हे स्तोत्र प्राचीन काळी श्री बुधकौशक नामक ऋषीनी श्री प्रभुरामचंद्राच्या महतीवर लिहिलेले आहे. हे स्त्रोत्र अत्यंत प्रसिध्द आणि प्रभावी असून ते संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे त्याचा अर्थ सर्वसामान्यांना समजून येत नाही. या महान स्तोत्राचे महात्म्य जनसामान्याना कळावे तसेच या स्त्रोत्राचा भावार्थ सहज लक्षात यावा या उदात्त हेतूने ओटवणे येथील कवि कृष्णा देवळी यांनी या स्तोत्राचा मराठी अनुवाद ओवीबद्द केला आहे. श्री. देवळी यांनी यापूर्वी ओटवणेसह सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थानवर माहिती तसेच आरत्या लिहिलेल्या आहेत. ही स्तोत्र पुस्तिका घरोघरी पोहोचून तिचे भावपूर्ण पठण सर्वांना करता यावे यासाठी ही पुस्तिका विनामूल्य भाविकांना देण्यात येणार आहे.
-----------------
जिल्ह्यात १४ सप्टेंबरला
राष्ट्रीय लोक अदालत
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडील प्रलंबित प्रकरणाचा तडजोडीने निकाली करण्यासाठी १४ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष यांनी दिली आहे. संबंधित वकील, पक्षकारांनी आयोगाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची असल्यास ५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा आयोगाकडे लेखी स्वरुपात कळावे. अशी प्रकरणे जिल्हा आयोगाकडील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवता येतील. यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.