कोकण

संत परंपरेसह बारा बलुतेदार जीवनपद्धतीवर भाष्य

CD

11806
11807

संत परंपरेसह बारा बलुतेदार जीवनपद्धतीवर भाष्य
पालघरवाडीत जिवंत देखावा ; संत विचारांचाही प्रसार
सचिन माळी/सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ः पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा महाराष्ट्राच्या संत पंरपरेची महती सांगत संतांचा गौरव करणारा जिवंत देखावा सादर केला आहे. या माध्यमातून ग्रामिण समाज जीवनावर आजही प्रभाव असलेल्या बारा बलुतेदारांच्या कार्यपध्दतीची नव्या पिढीला माहीती करुन दिली. येथील चलचित्र देखावा आकर्षणाचा विषय ठरला आहे.
बदलत्या काळात महाराष्ट्राला लाभलेल्या वैचारिक व अध्यात्मिक पंरपरेचा विसर पडला आहे आणि त्याचे परिणाम येथील समाज जीवनावर होत आहेत. ज्ञानेश्वरांपासून तुकारामपर्यंतच्या संत परंपरेची व त्यांनी मानव जातीस दिलेल्या विश्वकल्याणाच्या विचाराची नव्या पिढीस महती कळावी या उद्देशाने पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सर्व संताची माहीती देण्याचा केलेला प्रयत्न कौतूकाचा विषय ठरत आहे. बारा बलुतेदार म्हणजेच बार्टर सिस्टीमने खेड्यांनी नटलेल्या देशाची ग्रामिण भागातील आर्थव्यवस्था सांभाऴली. पैशापेक्षा वस्तु व सेवांचे आदान-प्रदान करुन अर्थकारणाचा गाडा वर्षानुवर्षे हाकला जात होता. बदलत्या काळात चलनी नाणी व नोटांमुळे ही व्यवस्था मोडकळीस येऊन संपुष्टात आली असली तरीही बारा बलुतेदारांच्या व्यवसायानुसार जातीत विभागणी झाली होती. ते व्यवसाय आजही सुरु आहेत. काळाच्या ओघात अनेक व्यवसाय मागे पडलेले किंवा कालबाह्य झालेले आहेत. शासनस्तरावर बारा बलुतेदारांच्या प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आज वेगवेगळ्या योजनांद्वारे सुरु आहे. या व्यवसायांना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बार्टर सिस्टीमने दीर्घकाळ या देशाची अर्थव्यवस्था सांभाळली असल्याने बलतुदेरांची कार्यपध्दतीची युवा पिढीला माहीती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न मंडळाने केले आहे.

चौकट
कष्टकरी व शेतकरी सभासद
पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७४ साली झाली असून कष्टकरी व शेतकरी सभासदांनी एकत्र येऊन श्रमदान करत व टाकावू वस्तुंपासून टिकावू सजावट करीत देखावे सादर केले आहेत. भूतकाळात शासन व विविध संस्थाचे मानाचे पुरस्कार जिंकून मंडळाचा राज्यात मोठा नावलौकीक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT