11818
पोषण अभियानाचा गणेशोत्सवात जागर
साळशीत संयुक्त उपक्रम; कुपोषण, सकस आहाराबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १५ : गणेशोत्सव काळात साळशी (ता.देवगड) येथे पोषण अभियानाचा जागर करण्यात आला. यावेळी कुपोषण, नवजात अर्भकांची काळजी याबाबत पर्यवेक्षिका पूजा सावंत यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने आहारामध्ये पालेभाज्यांचे महत्त्व, सकस आहाराबाबत विचारांची देवाण-घेवाण झाली. साळशी गावातील गावकरवाडी, देवणेवाडी, घाडीवाडी अंगणवाडी यांचा संयुक्त कृती कार्यक्रम पार पडला.
महिला व बाल विकास विभाग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत (आयसीडीएस) देवगड तालुक्यातील शिरगाव बीटच्या संकल्पनेतून पर्यवेक्षिका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. साळशी गावकरवाडी, देवणेवाडी, घाडीवाडीमधील अंगणवाड्यांनी संयुक्तपणे हा उपक्रम यशस्वीपणे राबविला. संतुलित आहाराबाबत अंगणवाडी सेविका प्रतीक्षा शिवलकर यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाला मदतनीस सुविधा किंजवडेकर, रसिका मिराशी, आशा स्वयंसेविका मिराशी, पालक पूजा गावकर, प्रतिभा गावकर, वैभवी गावकर, विठ्ठल लाड, प्रांजल लाड, वैभवी लाड, सत्यवती लाड, गणेश लाड, प्रिया लाड, श्रेया लाड, प्रतीक्षा गावकर, कार्तिकी गावकर, स्नेहलता गावकर, लता गावकर, सर्वेश गावकर, मधुरा गावकर, सीमा गावकर, विक्रम लाडगावकर, शिल्पा लाडगावकर, अर्णव लाडगावकर, हर्षल लाडगावकर, शिल्पा लाडगावकर, सुचिता गावकर, दीपक गावकर, कार्तिकी गावकर, प्रतीक्षा गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाला मुंबई स्थित व स्थानिक गावकर कुटुंबीयांचे सहकार्य लाभले. प्रकाश गावकर (सुभेदार) यांच्या निवासस्थानी पोषण अभियान अंतर्गत पोषण प्रभात फेरी, प्रतिज्ञा, आरती करण्यात आली. आहारामध्ये पालेभाज्यांचे महत्त्व, सकस आहाराबाबत अंगणवाडी सेविका अस्मिता मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.