- rat३०p६.jpg-
P२४N१५०४६
रत्नागिरी ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते पर्यटन मित्र पुरस्कार स्वीकारताना विजय हटकर.
विजय हटकरांना ‘पर्यटन मित्र’ पुरस्कार
पर्यटन विकास संचलनालय; प्रचार व प्रसाराचे कार्य
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ३० ः रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला दिशा देण्याच्या हेतूने रत्नागिरी येथे झालेल्या पर्यटन परिषदेत लांजा तालुक्याच्या पर्यटनवृद्धीसाठी कार्यरत असणारे लव्हेबल लांजा व रत्नसिंधू टुरिझमचे संचालक विजय हटकर यांना ‘पर्यटन मित्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जागतिक पर्यटनदिनानिमित्ताने रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिव्ह येथे महाराष्ट्र पर्यटन विकास संचलनालय कोकण विभाग, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था व लायन्स क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयावर आधारित पर्यटन परिषद झाली. या परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, कोकण विभागाचे पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, भाजप नेते निलेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने, माजी उपाध्यक्ष उदय बने, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, रमेश कीर, इन्फिगो आयकेअरचे डॉ. श्रीधर ठाकूर, राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. लांजा तालुक्यातील शेट्ये प्रशालेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे हटकर लांजा तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत लवेबल लांजा व रत्नसिंधू टुरिझम या संस्थांच्या माध्यमातून काम करत आहेत. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला लांजा तालुका जैवविविधतेने संपन्न असलेली गावे, नद्या, डोंगर, किल्ले, लेणी, वाडे, मंदिरे, धरणे, धबधबे, कातळशिल्पे याबाबतीत पर्यटन समृद्ध असून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लांजा तालुका पर्यटन नकाशाची निर्मिती हटकर यांनी केली. थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपाला आलेल्या माचाळ गावाला प्रसिद्धी देण्यासाठी ‘माझे माचाळ’ या पर्यटन पुस्तिकेचे त्यांनी लेखन केले आहे. माचाळ येथे पहिल्या सापड लोककला पर्यटन महोत्सवाचे आयोजन गवाणे येथे पर्यटन परिषदेचे आयोजन, कोट कातळशिल्पांची शोधमोहीम, रत्नागिरीचे अष्टविनायक व नवदुर्गा दर्शन या सहलींचे आयोजन करण्यात त्यांचे योगदान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.