- rat३०p७.jpg-
२४N१५०४७
करजुवे ः आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार स्वीकारताना मनोहर कनावजे.
आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार मनोहर कनावजेंना प्रदान
करजुवे विद्यालयात कार्यक्रम; विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः संगमेश्वर तालुका हिंदी शिक्षक मंडळ व माध्यमिक शिक्षण विभाग संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिन पखवाडा समापन कार्यक्रम करजुवे पंचक्रोशी शिक्षणसंस्थेचे माध्यमिक विद्यालय करजुवे येथे झाला. यंदाचा कृतिशील आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार दाभोळे हायस्कूलचे कृतिशील शिक्षक मनोहर कनावजे यांना देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुहास गेल्ये यांनी केले. या वेळी प्राचार्य नलावडे यांनी हिंदी तालुका शिक्षक मंडळ हे हिंदीभाषा प्रसार व प्रचाराचे काम उत्तम करत असून जिल्ह्यासह राज्यभरात त्यांनी आपल्या तालुक्याचा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. हिंदी भाषा पंधरवड्यानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन, कथाकथन, कहानी लेखन व विज्ञापन प्रस्तुती आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना तालुक्यातील विविध शाळांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल असा (प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ याप्रमाणे)ः देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा (प्राथमिक गट) : मीनाताई ठाकरे विद्यालय (साडवली), पाध्ये हायस्कूल (देवरूख), दादासाहेब सरफरे विद्यालय (बुरंबी), न्यू इंग्लिश स्कूल (देवरूख) व शिवाजी माध्यमिक विद्यालय (कोसुंब). देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा (माध्यमिक गट) - माध्यमिक विद्यालय (करजुवे), मीनाताई ठाकरे विद्यालय (साडवली), माध्यमिक विद्यालय (कुंभारखाणी), बुरंबी हायस्कूल व कोळंबे हायस्कूल. विज्ञापन प्रस्तुती स्पर्धा : एस. के. पी. एम. हायस्कूल (कोळंबे), बुरंबी हायस्कूल, माध्यमिक विद्यालय (कळंबस्ते), न्यू इंग्लिश स्कूल (कसबा) व माध्यमिक विद्यालय (करजुवे).
कहानी लेखन स्पर्धा : माही वनकर, अनन्या डोळस, विदिता खेडेकर, अर्णवी कानाल व राकेश वरवटकर यांना मिळाला. कथाकथन स्पर्धा : न्यू इंग्लिश स्कूल (देवरूख), दादासाहेब सरफरे (बुरंबी), माध्यमिक विद्यालय (करजुवे), जनता विद्यालय (अंगवली) व लोकविद्यालय (तुळसणी). या कार्यक्रमासाठी संस्था सचिव सूर्यकांत देवस्थळी, माजी सभापती सुभाष नलावडे, संचालक विकास नलावडे, माजी सरपंच व संचालक श्यामसुंदर माने, पं. स. माजी सदस्य संजय कांबळे, जिल्हा हिंदी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र खांबे, जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण सायली आंब्रे व सनम माने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.