कोकण

सत्य हेच प्रामाणिक पत्रकारितेचे तत्व

CD

15060

सत्य हेच प्रामाणिक पत्रकारितेचे तत्व

गजानन देसाई ः सावंतवाडीत पदविका अभ्यासक्रमाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः आजची पत्रकारिता वेगळी आहे; पण तत्व तेच आहे. पत्रकारिता सत्यावर आधारित असेल तर ती टिकून राहील. म्हणून नवीन पत्रकारांनी सत्याची कास धरली पाहिजे. सत्य हेच अंतिम आहे. समाजासमोर सत्य मांडणे, हे पत्रकाराचे काम आहे. सिंधुदुर्गला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा आहे. तो टिकवायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि कोल्हापूर अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव आणि केंद्रप्रमुख रमेश बोंद्रे, सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया संघाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, प्रा. रुपेश पाटील, केंद्र संयोजक राजेश मोंडकर उपस्थित होते.
डॉ. जी. ए. बुवा, रमेश बोंद्रे, हरिश्चंद्र पवार, अमोल टेंबकर, प्रा. रुपेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी केले. त्यांनी अभ्यासकेंद्राचा आढावा घेतला. सूत्रसंचालन मंगल नाईक जोशी यांनी केले. आभार विद्या राणे यांनी मानले. यावेळी अभ्यास केंद्रातर्फे शेखर सामंत यांचा शाल आणि श्रीफळ देऊन रमेश बोंद्रे यांच्या हस्ते, तर मागील वर्षातील यशस्वी विद्यार्थी व ''सकाळ''चे पत्रकार संदीप चव्हाण यांचा शेखर सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार दीपक गावकर, अनुजा कुडतरकर, विनायक गावस, प्रसाद माधव, भुवन नाईक, साबाजी परब, वाय. पी. नाईक आदी उपस्थित होते.
---
स्वाभिमान, निर्भीडपणाही हवा
शेखर सामंत म्हणाले, ‘‘समाज बिघडविणारी नव्हे, तर समाज घडविणारी पत्रकारिता आजच्या काळात गरजेची आहे. त्यादृष्टीने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पाऊल टाकावे. पत्रकारांकडे प्रामाणिकपणा, स्वाभिमान, निर्भीडपणा हवा, जो आज दुर्मिळ होत आहे. वाचनाची सवय हवी. सभोवतालकडे पाहण्याची व्यापक दृष्टी हवी, तरच तो चांगली पत्रकारिता करू शकतो. समाज घडवू शकतो. आज सोशल मीडियात बातमी आधी देण्याची स्पर्धा प्रचंड वाढली आहे. अशावेळी पत्रकाराने तारतम्य बाळगून बातमी द्यावी. समाज तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने पाहत असतो. त्यांच्या अपेक्षा, कसोट्यांवर उतरण्याची जबाबदारी तुमची आहे. पत्रकाराने लेखणी जबाबदारीने चालवावी. लेखणी आयुष्यही घडवते किंवा बरबादही करू शकते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT