चिखलीत गंजलेला
विद्युतखांब कोसळला
संगमेश्वर, ता. ३०ः संगमेश्वर तालुक्यातील चिखली-बौद्धवाडी येथे गंजलेला विद्युतखांब कोसळला. याबाबत गेली दोन वर्षे महावितरण कंपनीला वारंवार कल्पना देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कदम यांनी सांगितले. वीजप्रवाह बंद असताना हा खांब कोसळला अन्यथा जीवितहानी झाली असती, असेही कदम यांनी सांगितले.
चिखली बौद्धवाडी येथे अनेक विद्युतखांब हे पूर्णतः गंजलेले असून, याबाबत गेली दोन वर्षे ग्रामस्थ हे वारंवार महावितरण कंपनीकडे तक्रार करत आहेत; मात्र महावितरणकडून दुर्लक्ष झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शुक्रवारी सकाळी सुशील जाधव यांच्या घराजवळचा गंजलेला विद्युतखांब अचानक कोसळला. त्यामुळे जाधव यांच्या घराचे पत्रे तुटले. तिथूनच काही अंतरावर असणाऱ्या बौद्धविहाराजवळून काही मुले जात होती. त्यांच्या अंगावर तुटलेली वीजवाहिनी पडली; मात्र त्या वेळी रांगव येथे वीजवाहिनी तुटून बैल दगावला असल्याने वीजप्रवाह बंद करण्यात आलेला असल्याने जीवितहानी टळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.