कोकण

ःतुरंबवच्या मंदिरात रंगणार जाखडी नृत्य

CD

- ratchl३०१.jpg-
P२४N१५०८४
तुरंबवची शारदादेवी.

(टीप- दोन कॉलममध्ये फोटोसह घ्यावी.)
----------

तुरंबव मंदिरात रंगणार जाखडी नृत्य

नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम : गुरूवारी घटस्थापना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः तालुक्यातील तुरंबव येथील शारदादेवीच्या मंदिरात गुरूवारपासून (ता. ३ ऑक्टोबर) शारदोत्सव सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी देवीच्या रूप्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान देवीचे दर्शन व ओटी, साध्या नवसासोबत दररोज रात्री १०.३० वा. पारंपरिक जाखडी नृत्य नंतर भाविकांसाठी संततीविषयक नवस करणे आणि फेडण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. या कालावधीत मंदिर देवीच्या दर्शनासाठी सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहील. रात्री ९ वा. महाआरती व १०.३० वा. जाखडी नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
नवरात्रोत्सवात एसटी महामंडळाने चिपळूण-तुरंबव, सावर्डे-तुरंबव अशा विशेष बसफेऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू केल्या असून, त्यांचे वेळापत्रक चिपळूण आगारात लावले आहे. या कार्यक्रमासाठी कोकण रेल्वेने येणाऱ्या भाविकांना सावर्डे रेल्वेस्थानकात उतरावे लागेल. रेल्वेला सावर्डे येथे थांबा नसल्यास त्याने चिपळूण स्थानकात उतरून रस्त्याच्या मार्गाने तुरंबवपर्यंत प्रवास करावा लागेल. भाविकांना उत्तमरितीने दर्शन व्हावे व त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर न्यासाने सर्वतोपरी नियोजन केल्याचे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सांगितले. याबाबत अधिक माहितीसाठी भाविकांनी श्री शारदादेवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट, तुरंबव येथे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT