कोकण

‘बायोमेट्रिक’ची अंमलबजावणी तातडीने करा

CD

15112


‘बायोमेट्रिक’ची अंमलबजावणी तातडीने करा

श्रीमती गावडेंची मागणी; जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः ग्रामसेवक कार्यालयीन वेळेत येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत. त्यामुळे शासन निर्देशानुसार सर्व ग्रामसेवकांसह सर्व गटविकास अधिकारी, खाते प्रमुख यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करावी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही साहित्य खरेदी न करता खरेदी केल्याचे दाखवून ७२ लाख ८१ हजार रुपये हडप करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हा दाखल आहे. ग्रामपंचायत सदस्य व पर्यवेक्षणीय अधिकारी यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज निरवडे येथील सौ. श्रीमती लक्ष्मण गावडे यांनी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले.
सौ. गावडे यांच्या मते, ‘‘शासनाचे स्पष्ट निर्देश असूनही अद्यापही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणालीचा वापर केला जात नाही. जिल्हा परिषद खाते प्रमुख गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अद्यापही शासन प्रचलित नियमानुसार बायोमेट्रिकचा वापर करत नसून, शासनाची फसवणूक करून वेतन घेत आहेत. तरी संबंधितांवर दोन वेतनवाढ रोखण्याची प्रशासकीय कारवाई करावी. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीमध्ये २०२१- २२, २०२२-२३ या काळात साहित्य खरेदीसाठी ७२ लाख ८१ हजार ७० एवढी रक्कम कुठलेही साहित्य खरेदी न करता खरेदी दाखवून १४ व १५ वा वित्त आयोगातील रक्कम हडप करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल केला आहे; मात्र यामध्ये सहभागी असलेल्या ग्रामपंचायत सदस्य व पर्यवेक्षणीय अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा. गावामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे विकासाच्या दृष्टीकोनातून शासकीय योजना अंमलबजावणीसाठी फार मोठे महत्त्वाचे पद आहेच परंतु निर्धारित वेळेत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांच्या समस्या अनेक दिवस प्रलंबित राहतात. याचा सर्वाधिक मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागतो.’’
--
अकराला येतात, तीनला गायब होतात!
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे सर्वसाधारण ११ वाजल्यानंतरच कार्यालयात येतात व ३ वाजल्यानंतर गायब होतात, ही ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे. पर्यवेक्षणीय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी (पंचायत समिती), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे याबाबत कोणतेही नियंत्रण ठेवत नाहीत. याचा फायदा संबंधित ग्रामसेवक घेत असल्याचे दिसून येत आहे. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, मुख्य कार्यकारी अधिकारी हे याबाबत नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्याने गैरव्यवहारांसारखी प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना तातडीने बायोमॅट्रिक हजेरी बंधनकारक करावी, अशी मागणी करीत सौ. गावडे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT