कोकण

म्हापण-पाट बाजारपेठ येथे गुरुवारपासून नवरात्रोत्सव

CD

15133

म्हापण-पाट बाजारपेठ येथे
गुरुवारपासून नवरात्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३० : उत्साही मित्रमंडळ म्हापण यांच्यावतीने म्हापण-पाट बाजारपेठ पिंपळपार येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यानिमित्त विविध धर्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (ता. ३) देवीचे आगमन, पूजन, आरती व ग्रामस्थांची भजने, दांडिया व गरबा, ४ ला रात्री ९ वाजता नाईक-मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ (मोचेमाड-वेंगुर्ले) यांचे नाटक, ५ ला रात्री ९ वाजता नटराज प्रोडक्शन प्रस्तुत तुळशिदास दिग्दर्शक विश्वकला मंच सावंतवाडी निर्मित, कलाविष्कार नृत्य डान्स विनोदांचा खास आकर्षक ‘महाशिवतांडव’, रामायण, स्री अत्याचार, गोंधळ नृत्य, महाभारत, थीम डान्स तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, ६ ला खुली व ग्रामीण रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. खुल्या स्पर्धेसाठी अनुक्रमे ४०००, ३०००, २०००, ग्रामीण भागासाठी २५००, २०००, १००० रुपये, तसेच विजेत्या स्पर्धकांना कायमस्वरूपी चषक व प्रशस्‍तिपत्रक देण्यात येणार आहे. ग्रामीणसाठी प्रथम २० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी गुरुनाथ मडवळ, गणेश इलकर, जगदीश म्हापणकर यांच्याशी संपर्क साधावा. उत्सवात ७ ला बाबा मेस्री ग्रुप नेरुर निर्मित ‘कोकणचो शिमगो’ (खास आकर्षण दशानन रावण, महाकाय बजरंगबली, गरुड, वाघ, आदी विविध चलचित्रे व हालते देखावे), ८ ला खुली दांडिया स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी ७०००, ५००० व ३००० रुपये बक्षिसे, (कै.) अण्णा मंडळ स्मरणार्थ कायमस्वरूपी चषक व प्रशस्‍तिपत्र देण्यात येईल. स्पर्धकांनी गुरुनाथ मडवळ, गणेश ईलकर यांच्‍याशी संपर्क साधावा. ता. ९ ला रात्री ९ वाजता वैभवी क्रिएशन डिचोली-गोवा निर्मित व अमर फाळकर प्रस्तुत रहस्यमय विनोदी मराठी नाटक ‘अग्गबाई सुनबाई’, १० ला सायंकाळी ७.३० वाजता दिनेश वागदेकर आणि गुंडू बुवा यांचा डबलबारीचा सामना, ११ ला चिमणी पाखरं डान्स अॅकॅडमी (कुडाळ) आयोजित ‘जलवा २०२४’, १२ ला विजयादशमी निमित्त सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा ‘झंकार’ (कोल्हापूर), १३ ला दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता विसर्जन मिरवणूक (श्री देव रवळनाथ ढोलपथक, तिर्लोट-देवगड) निघणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्साही मित्रमंडळ म्हापण यांच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT