‘मातोश्री’वरील चिपळूण मतदारसंघाची बैठक रद्द
तिढा कायम ; इच्छुकांसह पदाधिकारी मुंबईत, ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ३० : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांच्या ‘मातोश्री’वरील बैठकीत चिपळूण मतदारसंघाची बैठक अचानक रद्द करण्यात आली. तश्या साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाचा कोणताही अजून कायम आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चिपळूण दौऱ्यानंतर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. रत्नागिरी मतदार संघातील संभाव्य उमेदवाराविषयी कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या मतदार संघातील उमेदवाराबाबत अजूनही ‘वेट ॲण्ड वॉच’ आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ''मातोश्री''वर इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बालावली होती. या बैठकीत राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र चिपळूणबाबतची बैठक अचानक रद्द करण्यात आली. राजापूर आणि गुहागर मध्ये विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दापोली मध्ये जिल्हाध्यक्ष स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांना काहीही करून रत्नागिरी ची जागा निवडून आणायची आहे असा कानमंत्र उद्धव ठाकरेंनी दिले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर चिपळूणची बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यात चिपळूण वगळता चारही आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र, राजकीय स्थित्यंतरानंतर चिपळूणचे आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तर दापोली, रत्नागिरीचे आमदार शिंदेसेनेसोबत गेले आहेत. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेसेनेकडे दोन आमदार आहेत. आगामी निवडणुकीत उमेदवारी वाटप करताना जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे ती जागा त्याच पक्षाला देण्याचे महाविकास आघाडीने निश्चित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाच जागांपैकी चिपळूण वगळता उर्वरित चार जागा उद्धव ठाकरे सेनेला देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
-----
गुहागरात कोण चालेल?
गुहागर मतदारसंघाबाबत मिलिंद नार्वेकर व विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी तुम्हाला कोण उमेदवार चालेल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पदाधिकाऱ्यांनी कोणी चालेल असे सांगितले, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुहागरमधून तगडा उमेदवार दिल्यास ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.