15481
पथविक्रेता समितीवर भाजपचे वर्चस्व
समीर नलावडे : सर्व जागा भाजपच्या ताब्यात
कणकवली, ता. ३ : कणकवली नगरपंचायत पथविक्रेता समितीची निवडणूक झाली. या निवड प्रक्रियेत फॉर्म मागे घेतल्यानंतर या समितीच्या आठ पैकी सात जागांवर भाजपच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. तर एक जागा रिक्त राहिली आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली शहर भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक विराज भोसले, कंझुमर सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, गौरव हर्णे, सागर होंडावडेकर आदी उपस्थित होते. या निवडणुकीत सागर होंडावडेकर, हरेश ढवण, संजय परब, हनुमंत तेंडुलकर, सान्वी गावडे, शबिना मकतुमसाबा दोडमणी, सूर्यकांत ठाकर यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
चौकट
जानवली पूल आणि धबधब्याचे लवकरच उद्घाटन
कणकवली शहरतील जानवली नदीवरील पुलाचे काम जुलैमध्ये पूर्ण झाले. या पुलाचे उद्घाटन लवकरच माजी केंद्रीयमंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या पुलालगत असलेल्या कृत्रिम धबधब्याचेही लोकार्पण त्यावेळी होईल, असे श्री. नलावडे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.