कोकण

डॉ. मनिषा वाघमारे कोकणातील पहिल्या महिला डबल एसआर

CD

-ratchl२६.jpg-
२४N१५६५६
डॉ. मनीषा वाघमारे
----------

डॉ. मनीषा वाघमारे ‘डबल एसआर’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण या ऑडाक्स क्लबतर्फे आयोजित पाटण पंढरपूर पाटण असा ६०० किमी बीआरएम पूर्ण करून येथील डॉ. मनीषा वाघमारे यांनी एकाच वर्षात डबल एसआर बनण्याचा बहुमान पटकावला आहे. एकाच वर्षात २०० किमी, ३०० किमी, ४०० किमी, ६०० किमी बीआरएम पूर्ण केल्यानंतर एसआर (सुपर रँडोनिअर) हा किताब मिळतो.
डॉ. वाघमारे या चिपळूण सायकलिंग क्लबच्या अग्रणी महिला रायडर राहिल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक सायकलिंग स्पर्धेत सहभागी होत आपला ठसा उमटवला आहे. पहिली एसआर सीरिज पूर्ण केल्यानंतर १ हजार किमी बीआरएम पूर्ण करून ही बीआरएम पूर्ण करणारी कोकणातील पहिली महिला रायडर बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. डॉ. वाघमारे या नामांकित नेत्रतज्ज्ञ असून विविध वैद्यकीय संघटनांमध्ये त्या कार्यरत आहेत. या आधी त्यांनी कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथील डुएथलॉन, सायक्लोथॉनमध्ये भाग घेऊन आपली छाप उमटवली आहे. त्या इंटरनॅशनल योगा शिक्षकसुद्धा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT