राजकीय नेत्याविरोधात
भाजप कार्यकर्त्याचे उपोषण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ः अनधिकृत बांधकाम व सिक्युरिटी गार्डकडून दहशत होत असल्याबाबत एका भाजपच्या कार्यकर्त्याने एका राजकीय पदाधिकाऱ्याविरोधात येथील पोलिसात उपोषण छेडले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाअंती हे उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणकर्त्याच्या म्हणण्यानुसारः ''संबंधित युवा पदाधिकाऱ्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत अनाधिकृत बांधकाम केले आहे तर घराबाहेर हत्यारबंद बंधूकधारी सेक्युरीटी गार्ड ठेवले असून सेक्यूरिटी गार्ड गावच्या रहदारीच्या रस्त्यावर उभा असतो. त्यामुळे गावातील रहीवाशांमध्ये या रस्त्यावरुन जातांना येतांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनधिकृत बांधकाम आणि सिक्युरिटी गार्डच्या दहशती संदर्भात आपण संबधित ग्रामपंचायतीला तक्रार अर्ज दिला होता.''
त्यामुळे त्या राजकीय पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांनी उपोषण केले. पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी त्यांना या संदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.