कोकण

शिवसेना टेटवली सहसचिवपदी कदम

CD

शिवसेनेच्या टेटवली
सहसचिवपदी संदेश कदम

गावतळे ः दापोली तालुक्यातील गावतळे येथील संदेश कदम यांची शिवसेनेच्या टेटवली सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी त्यांच्या कांदिवली येथील पालखी बंगला येथे २९ सप्टेंबरला हे नियुक्तीपत्र दिले. कदम हे मुंबई गोरेगाव संतोष नगर येथे वास्तव्यास असले तरीही त्यांचा दापोलीत चांगला संपर्क आहे. त्यांच्या निवडीबद्दल सचिव गजानन गायकवाड, संकेत पाते, नरेश घरटकर यांच्यासह गावतळे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.
-----
‘माखजन’च्या ११ खेळाडूंची
स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड

संगमेश्वर ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने चिपळूण येथे झालेल्या जिल्हास्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धेत माखजन इंग्लिश स्कूल व पी. आर. नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची स्क्वॅश या खेळप्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून प्रत्येक गटात ३५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी १९ वर्षांखालील गटात तन्वी पकडे, शमिका गोटेकर, चांदणी भुवड, श्रेया फणसे, प्रणव भुवड यांचा समावेश आहे. १७ वर्षांखालील गटात मौलिका जाधव, वर्धा भागवत, ओमकार दहिवलकर तर १४ वर्षांखालील गटात परी विचारे, कृतिका गोताड व आरूष पवार या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संस्थेचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बापट, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापिका रूही पाटणकर यांनी गुणवंत खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक निखिल वारके व अभिजित सुर्वे यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT