कोकण

काळी फिल्म बसविणाऱ्या ३६ जणांना दंड

CD

काळी काच बसवणाऱ्या ३६ जणांना दंड

जिल्हा वाहतूक शाखा; सुरक्षिततेसाठी खिडक्या पारदर्शी ठेवा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : मोटारींच्या काचा पारदर्शी ठेवणे आवश्यक असतानाही नियम धाब्यावर बसवून काचांना काळी फिल्म बसवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांत या शाखेकडून काचांना काळी फिल्म लावलेल्या ३६ वाहनधारकांवर कारवाई करून २१ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
मोटारवाहन कायद्यानुसार, मोटारीच्या काचा या पारदर्शी असणे आवश्यक केले आहे. यापूर्वी ३० टक्क्यांपर्यंतचे फिल्मिंग करण्यास परवानगी होती ज्यातून आतील व्यक्ती आणि हालचाली बाहेर दिसणे आवश्यक होते; मात्र अनेक वाहनचालक या नियमाला हरताळ फासून गडद काळ्या काचा वाहनाला बसवतात. अशा चारचाकी आढळल्यास मालकाला पहिल्यावेळी ५०० रुपयांचा दंड आणि दुसऱ्यावेळी पुन्हा हाच गुन्हा केल्यास १ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला जातो.
जिल्हा वाहतूक शाखेकडून चारचाकी वाहनांच्या खिडक्यांना गडद काळ्या काचा बसवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत या शाखेने ३६ वाहनांवर कारवाई करून २१ हजार रुपयांचा दंड केला. १५०० रुपयांचा दंड आकारला जातो. अशा वाहनांवर येथील जिल्हा वाहतूक शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
----
काच बसवण्याचा नियम-

सुरक्षेच्यादृष्टीने वाहनांच्या खिडक्यांच्या काचा काळ्या न करता पारदर्शी असाव्यात. वाहनातील प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी काचा ३० टक्क्यांपर्यंत काळ्या ठेवता येतात; मात्र आतील दिसणे गरजेचे आहे.
--------
दृष्टिक्षेपात...
* आठ महिन्यात ३६ जणांवर कारवाई
* २१ हजाराच दंड वसूल
* ५०० रुपये दंडाची रक्कम
* पुन्हा सापडल्यास १५०० रुपये दंड
* काच ३० टक्के काळी ठेवता येते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT