-rat३p२४.jpg-
P२४N१५९५९
साखरपा : मार्गफलक देताना ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये.
---------
साखरपा-रत्नागिरी एसटीला मार्गफलक
साखरपा, ता. ४ : नव्याने सुरू झालेल्या एसटी फेरीला मार्गफलक देण्यात आला आहे. कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांच्या प्रयत्नातून सकाळी साखरपा-रत्नागिरी ही फेरी नव्याने सुरू करण्यात आली आहे. सकाळी साखरपा परिसरातून रत्नागिरीला जाण्यासाठी एसटी नाही, ही बाब ग्रामपंचायत सदस्या हर्षा आठल्ये यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी विभागाकडे एसटी सुरू करावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी पत्रव्यवहारही केला. सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लांजा आगारातर्फे सकाळी साखरपा-रत्नागिरी ही एसटी फेरी सुरू करण्यात आली आहे. या बसला मार्गफलक नसल्याने तो मार्गफलक आठल्ये यांनी स्वखर्चाने तयार करून साखरपा स्थानकाकडे सुपूर्द केला.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.